PM किसान योजनेचा 21 वा हप्ता कधी येणार? खात्यात जमा होणार या दिवशी, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर!

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. सध्या शेतकरी 21 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

केंद्र सरकारने अलीकडेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रॅक्टर आणि शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांची किंमत कमी व्हावी म्हणून जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

20 वा हप्ता थोडा उशिरा जमा झाला होता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की 21 वा हप्ता नेमका कधी मिळणार? याबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

दिवाळी हा मोठा सण जवळ येत असल्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 21 वा हप्ता दिवाळीच्या आधीच जमा करू शकते, अशी शक्यता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑक्टोबर महिन्यात पैसे मिळाले होते. 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला आणि 2023 मध्ये 5 ऑक्टोबरला पैसे मिळाले होते. यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे, त्यामुळे त्याच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

यावर्षी बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधीच सरकार पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणूक आयोग सप्टेंबरच्या शेवटी कार्यक्रम जाहीर करू शकतो. एकदा आचारसंहिता लागली की निधी वितरण थांबते, त्यामुळे ऑक्टोबरमध्येच 21 वा हप्ता जाहीर होईल अशी माहिती मिळत आहे.

👉 थोडक्यात सांगायचं तर, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे

Leave a Comment